रमज़ानच्या पवित्र महिन्यात लोडशेडींग बंद करण्याची मागणी. इत्तेहाद ग्रुपच्या वतिने ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणीचे निवेदन. - Aajtakreporter

Gb

Thursday, 2 May 2019

रमज़ानच्या पवित्र महिन्यात लोडशेडींग बंद करण्याची मागणी. इत्तेहाद ग्रुपच्या वतिने ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना मागणीचे निवेदन.


अनवर पठान,(संपादक)दि.02/05/2019.
 इत्तेहाद ग्रुपच्यावतिने रमजानच्या पवित्र महिन्यात लोडशेडिंग बंद करण्यात यावी या संबधिचे निवेदन एका पत्राद्वारे आज ऊर्जा मंत्री महाराष्ट्र राज्य यांना देण्यात अाले.
मुस्लिम समाजातिल पवित्र रमजान महिना हे या वर्षी मे महिन्याच्या पहिल्या टप्पयात म्हणजे 7 मेला सुरु होत असल्याने उष्णता हि तिव्र असल्याने रोजेदाराना रोजे कठिन जानार आहे.या महिण्यात मुस्लीम समाज हा दिवस भर उपवास करतो व रात्री उशीरापर्यंत धार्मिक कार्यक्रम करतात.त्यात सेलु तालुक्यात 8 तास  लोडशेडिंग मुळे या त्रासात जास्त भर होनार आहे.या सर्व बाबी लक्षात घेता राज्य शासनाने एक महिण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्रातच लोडशेडिंग बंद करावी या मागनीचे निवेदन दि.02/05/2019.रोजी देण्यात आले आहे.
निवेदनावर अध्यक्ष.अनवर पठान.सत्तार पठान.शे.अफज़ल.समीर पठान. आबेद कुरेशी आदिच्या स्वाक्षर्या आहेत.

No comments:

Post a Comment